कांद्याला रोगांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:33 PM2019-12-15T22:33:13+5:302019-12-16T00:27:23+5:30

ढगाळ हवामान, पहाटेचे धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने हमीभावाची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

Disease the onion | कांद्याला रोगांचा विळखा

कांद्याला रोगांचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देपाटोदा : औषधांची फवारणी

पाटोदा : ढगाळ हवामान, पहाटेचे धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने हमीभावाची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
येवला तालुक्यात नकदी पीक म्हणून कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी हजारो एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या पोळ कांद्याला परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत काही शेतकऱ्यांनी उशिराने कांदा रोपे टाकली, तर काहींनी उपलब्ध होईल तेथून मिळेल त्या भावात रोप विकत घेऊन हजारो हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड केली. यासाठी एकरी सुमारे एक लाख रु पयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होत असून, पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत आहे, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने कांदा पिकावर मर, मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवड केलेला कांदा पोसण्यास सुरू झालेली असतानाच वातावरणात बदल झाल्याने कांदा पिवळा पडू लागला आहे. तसेच वाढही खुंटली आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावर्षी नाशिक जिल्ह्यात शेतकरीवर्गाने कोट्यवधी रु पये खर्च करून लाल, पोळ कांद्याची सुमारे ६८ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली होती. मात्र ऐन मोसमात आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मुक्काम ठोकल्याने सुमारे ५४ हजार ४०७ हेक्टर क्षेत्रावरील कांदा बाधित झाला, तर शिल्लक १३ हजार ८१८ हेक्टर क्षेत्रावरील पीक विविध रोगांचा बळी पडले.

उत्पादनात मोठी घट आली आहे. परिणामी कांदा दराने उच्चांकी गाठली आहे. मात्र शेतकºयांकडे आता कांदाच शिल्लक नसल्याने या दरवाढीचा फायदा होत नसल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र रोग नियंत्रणात येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
- दत्तात्रय नाईकवाडे, कांदा उत्पादक, पाटोदा

 

Web Title: Disease the onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.