उसावर रोग व किडीचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:47+5:302021-09-12T04:18:47+5:30
मुखेड परिसरात यावेळी पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच आतापर्यंत अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या वातावरणातील बदलामुळे उसावर तांबेरा ...
मुखेड परिसरात यावेळी पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच आतापर्यंत अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या वातावरणातील बदलामुळे उसावर तांबेरा ( फुक सिनीया मॅके नो सिकला) हुमणी पांढरा मावा या रोगांनी आक्रमण केले आहे. तांबेरा रोगात ऊस पिकाचे ४० टक्केपर्यंत नुकसान होते. सुरुवातीला पानांच्या खालच्या बाजूला लहान लांबट पिवळे ठिपके येतात. पुढे ते वाढतात. लालसर तपकिरी होतात. ठिपक्याचा भाग फुगतो व फुटतो. त्यातून नारिंगी बीजाणू बाहेर पडतात. बीजाणूची पावडर बोटास सहज लागते. रोगाची तीव्रता वाढल्यानंतर पाने करपून जातात. वाढ खुंटते व साखरेचे प्रमाण कमी होते. यासंदर्भात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी शिवाजी देवकर, विभागीय अधिकारी राहुल वक्ते यांनी अशा प्रकारच्या कीड व कीटकांसाठी तांबेरा रोगासाठी औषध फवारणी करून ऊस पिकाचे संरक्षण करावे असे आवाहन केले आहे.