स्पा सेंटरमधील देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त
By admin | Published: May 24, 2017 03:47 PM2017-05-24T15:47:15+5:302017-05-24T15:52:20+5:30
स्पा सेंटरच्या नावाखाली कॉलेजरोड सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय
नाशिक : स्पा सेंटरच्या नावाखाली कॉलेजरोड सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय पोलीसांनी अखेर उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे यापुर्वी देखील या स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली होती; मात्र तरीदेखील पुन्हा स्पा सेेंटरच्या आड देहविक्री कशी सुरू झाली हा चर्चेचा विषय ठरत आहे.
शहरातील कॉलेजरोड परिसर हा हायप्रोफाईल भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी विविध मॉल्स, सिनेमागृह, महाविद्यालये आहेत. या भागात सध्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने स्पा सेंटर सुरू झाले आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड, विसे मळा, येवलेकर मळा आदि भागांमध्ये स्पा सेंटरचे जाळे वाढत असून यामध्ये बहुसंख्य स्पासेंटरच्या आतमध्ये देहविक्री होत असल्याचे अनेकदा पोलिसांच्या कारवाईमधून उघडकीस आले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश देवीकर यांनी महिला पोलिसांच्या पथकासोबत येथील ‘एक्झोटिक’ स्पा सेंटरवर धाड टाकली. यावेळी सेंटरमधून सात मुलींना ताब्यात घेण्यात आले.
तसेच पाच पुरूषांनाही अटक करण्यात आली असून स्पा सेंटरचा मालक संशयित परेश सुराणा हा फरार असून त्याच्यावर देहविक्रीच्या व्यवसाय चालविण्याप्रकरणी पोलिसांनी पुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित सुराणा याचा शोध सुरू असल्याचे देविकर यांनी सांगितले. या स्पा सेंटरवर कारवाईची दुसरी वेळ असून यापुर्वी कारवाई होऊनदेखील पुन्हा स्पा सेंटर सुरू कसे झाले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.