देहविक्रय अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 10:27 PM2017-08-03T22:27:26+5:302017-08-03T22:27:30+5:30
नाशिक : शहरातील कॉलेजरोड परिसर पुन्हा एकदा ब्युटी स्पा, ब्युटी पार्लरच्या नावाखाली चालणारा देहविक्रीच्या व्यवसायामुळे चर्चेत आला. गुरूवारी (दि.३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमाराच पोलिसांनी संशयित पार्लरवर छापा मारून वेश्याव्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केला.
गंगापूररोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजरोड परिसरात एका ब्युटी पार्लरमध्ये देहविक्रयचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश देविकर, पोलीस उपनिरिक्षक भारती धनेश्वर यांनी पोलीस पथकासह छापा मारला.
कॉलेजरोडवरी साई दरबार कॉम्प्लेक्सच्या दुसºया मजल्यावरील ह्यब्युटी कट्स-स्लीमिंग व हेअर सेंटरह्ण या ब्युटी पार्लरमध्ये निशा अनिल गोरे व श्रीकांत गोपाल लड्डा हे दोघे संशयित दोन पिडित महिलांकडून देहविक्रयचा व्यवसाय बळजबरीने करुन घेत असल्याचे आढळले. पोलिसांनी या दोन्ही संशयितांना अटक केली असून त्यांच्याविरुध्द कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.