नागरिकांमध्ये नाराजी : गोविंदनगर-कर्मयोगीनगर परिसरात कचरा दुभाजक नव्हे कचराकुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:06 AM2018-04-06T01:06:52+5:302018-04-06T01:06:52+5:30
सिडको : महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी विविध योजना राबविला जात असल्यातरी गोविंदनगर ते कर्मयोगीनगर या भागातील मुख्य रस्त्यातील दुभाजकांमध्ये घाण झालेली आहे.
सिडको : महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी विविध योजना राबविला जात असल्यातरी दुसरीकडे मात्र गोविंदनगर ते कर्मयोगीनगर या भागातील मुख्य रस्त्यातील दुभाजकांमध्ये घाण झालेली असून, मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा साचलेला असल्याने दुभाजकांची परिस्थिती ही कचराकुंडीसारखी झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यामुळे परिसराला बकालस्वरूप प्राप्त झाले असून, याकडे मनपाने संपूर्ण दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मधोमध महापालिकेच्या वतीने दुभाजक टाकले आहे. यातील गोविंदनगर येथील प्रवेशद्वारावर एका खासगी संघटनेच्या वतीने सुशोभिकरण केले असल्याने परिसर स्वच्छ व सुंदर दिसत असून, काही अंतरावरच मनपाच्या दुर्लक्षामुळे दुभाजकाची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. गोविंदनगर ते कर्मयोगीनगर या मुख्य रस्त्यावरील दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साचलेला असून, काही ठिकाणचे दुभाजक तुटलेले आहे. या दुभाजकांमध्ये पालापाचोळा तसेच खडी, घाण साचलेली आहे. याबरोबरच काही ठिकाणी तर झाडांच्या फांद्यादेखील पडलेल्या असल्याने शहर स्वच्छतेची वल्गना करणाºया मनपाचे याकडे किती लक्ष आहे हे दिसून येते.