अंदरसूल येथे बस थांबत नसल्याने नाराजी

By admin | Published: September 6, 2014 10:16 PM2014-09-06T22:16:53+5:302014-09-06T22:16:53+5:30

अंदरसूल येथे बस थांबत नसल्याने नाराजी

Disgruntled because the bus does not stop at Arsurul | अंदरसूल येथे बस थांबत नसल्याने नाराजी

अंदरसूल येथे बस थांबत नसल्याने नाराजी

Next

 

येवला : अंदरसूल बसस्थानकात सर्व बस न थांबल्यास विद्यार्थ्यांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.
येथून येवल्याला सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असतानाही अंदरसूल बसस्थानकावर बस न थांबता पुढे जाऊन थांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती बस धावत पकडणे शक्य होत नाही. वैजापूर व येवला आगाराच्या बसच्या बाबतीत या स्वरूपाच्या तक्रारी आहेत.
याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकवेळा ही अडचण आगार व्यवस्थापनाकडे सांगितली; परंतु याची दखल घेण्यात आली नाही. दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी वैजापूर डेपोची औरंगाबाद-नाशिक बस अंदरसूल बसस्थानकावर न थांबता स्थानकापासून २०० मी. अंतरावर थांबली. विद्यार्थ्यांची परीक्षेची वेळ असल्याने ते धावत बस पकडण्यासाठी गेले. या बसमध्ये कु. मयुरी वल्टे व इतर मुली चढत असताना चालकाने जोरात बस पुढे नेल्याने ती मुलगी खाली पडली. डोक्याला जबर मार लागल्याने ती रुग्णालयात नेत असताना मरण पावली. या घटनेमुळे सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन अशा प्रकारचे आडमुठे धोरण बंद करावे व विद्यार्थ्यांशी आपुलकीने आचरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शिवसेना शहरप्रमुख राजकुमार लोणारी, साजीद शेख, धीरज परदेशी, आशिष अनकाईकर यांच्यासह ५० कार्यकर्त्यांनी दिला. (वार्ताहर)

Web Title: Disgruntled because the bus does not stop at Arsurul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.