ढोलबारे परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:00 AM2019-03-04T01:00:32+5:302019-03-04T01:00:50+5:30
वीरगाव : येथून जवळच असलेल्या आव्हाटी, ढोलबारे परिसरातील कुंभाऱ्या डोंगर परिसरात बिबट्याचे कायम वास्तव्य असून, तो आता नागरी वस्तीत येऊन हैदोस घालत आहे. पांडे वस्तीवरील एका गायीचा फडशा पाडल्याने बिबट्याची दहशत वाढली आहे. याठिकाणी मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने वनविभागाकडून त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वीरगाव परिसराला लागून असलेल्या आव्हाटी, ढोलबारे या डोंगररांगेत कुंभाऱ्या डोंगर असून, याठिकाणी बिबट्याचा कायमचा मुक्काम आहे. या ठिकाणी बºयापैकी जंगल परिसर असल्याने बिबट्या नागरी परिसरात येत नाही; परंतु यंदा दुष्काळी स्थिती असल्याने भक्ष्य व पाण्याच्या शोधात बिबट्या थेट नागरी वस्तीत येऊ लागला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून एका बिबट्याने ढोलबारे परिसरात भटक्या व पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी (दि. २) पहाटे पांडे वस्तीवरील मनीषा पांडे यांच्या मालकीच्या गाईवर हल्ला करत ठार केले. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या भागात मेंढपाळांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून, पशुधनासह मेंढपाळ बांधव वास्तव्याला आहेत. बिबट्याने वस्तीवरील पाळीव प्राण्यांची शिकार करण्याचा सपाटा लावल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. त्यामुळे परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांनी केली आहे.