जोरण परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:56 PM2018-08-31T23:56:25+5:302018-09-01T00:20:40+5:30
बागलाण तालुक्यातील जोरण परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. परिसरात मका, बाजरी, ऊस, विविध प्रकारांची पिके आहेत. पिकांची उंची वाढल्यामुळे परिसरातील मका व उसाच्या पिकात लपता येत असल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे.
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. परिसरात मका, बाजरी, ऊस, विविध प्रकारांची पिके आहेत. पिकांची उंची वाढल्यामुळे परिसरातील मका व उसाच्या पिकात लपता येत असल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून एक बिबट्या व दोन बछडे परिसात आढळून आले आहेत. परिसरात पावसाने उघडीप दिल्याने येथील शेतकरी वेळ मिळेल तेव्हा शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जातो. तळवाडे रस्त्यालगत असलेले शेतकरी नंदू कोर यांच्या मका पिकात दोन दिवसांपासून बिबट्या व दोन बिछडे आढळून आले आहेत. शेतकरी नंदू कोर व मुलगा शेतात पिकास पाणी भरत होते. तेव्हा मका पिकातून बिबटा नंदू कोर यांच्या मुलावर झडप घालणार तेवढ्यात कोर यांनी आरडाओरड केली. जवळच असलेल्या शेतकऱ्यांनी धाव घेत बिबट्या पळवून लावले.