हरसूल ग्रामपंचायतीतर्फेजंतुनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 04:46 PM2020-09-23T16:46:57+5:302020-09-23T16:57:59+5:30

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी ग्रामीण बहुल भाग असलेला हरसूल शहरात सध्या कोरोनाने जोरदार शिरकाव केल्याने हरसूल बरोबर परिसराचे दाबे दणाणले आहे. एकाच दिवशी १६ अहवाल पॉझीटिव्ह आल्याने ग्रामपंचायततर्फेजंतुनाशक फवारणी करण्यात आली असून प्रतिबंधित क्षेत्रात ही प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात आल्याची माहिती हरसूलच्या सरपंच सविता गावित, उपसरपंच नितीन देवरगावकर, ग्रामविकास अधिकारी किशोर मराठे यांनी दिली आहे.

Disinfectant spraying by Harsul Gram Panchayat | हरसूल ग्रामपंचायतीतर्फेजंतुनाशक फवारणी

हरसूल : ग्रामपंचायतीतर्फे फवारणी करतांना कर्मचारी.

Next
ठळक मुद्देएकाच दिवसात १६ अहवाल पॉझीटिव्ह : प्रतिबंधित क्षेत्रात ही उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी ग्रामीण बहुल भाग असलेला हरसूल शहरात सध्या कोरोनाने जोरदार शिरकाव केल्याने हरसूल बरोबर परिसराचे दाबे दणाणले आहे. एकाच दिवशी १६ अहवाल पॉझीटिव्ह आल्याने ग्रामपंचायततर्फेजंतुनाशक फवारणी करण्यात आली असून प्रतिबंधित क्षेत्रात ही प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात आल्याची माहिती हरसूलच्या सरपंच सविता गावित, उपसरपंच नितीन देवरगावकर, ग्रामविकास अधिकारी किशोर मराठे यांनी दिली आहे.
हरसूल येथील कोरोना बाधित रु ग्ण आढळून आल्याने हरसूल ग्रामपंचायततर्फे जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण हरसूल शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली असून हरसूल ग्रामस्थांसह खेडेगावातून येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टरन्स तसेच मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रु ग्ण बधितांची संख्या वाढू नये यासाठी आरोग्य विभाग, हरसूल पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच हरसूल ग्रामपंचायत प्रयन्तशील असून उपाय योजना करीत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी सरपंच सविता गावित, उपसरपंच नितीन देवरगावकर, ग्रा. सदस्य राहुल शार्दूल, अनिल बोरसे, प्रतिभा लांघे, संजय देशमुख, तुळशीराम देशमुख, संगीता गावित, भारती व्यवहारे, लता तुंबडे, फरिन शेख, रंजना कोथमिरे, प्रकाश मेढे, पुष्पा मेढे, अशोक लांघे, हिरामण गावित, ग्रामविकास अधिकारी किशोर मराठे आदी प्रयन्तशील आहेत.
 
Web Title: Disinfectant spraying by Harsul Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.