नांदूरवैद्य येथे आरोग्य तपासणीसह जंतूनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 04:27 PM2020-09-26T16:27:17+5:302020-09-26T16:28:10+5:30
नांदूरवैद्य : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे बेलगाव कुर्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेविका मंगला कणसे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे आदींनी घरोघरी जाऊन कुटुंबाची थर्मामीटरद्वारे तपासणी करत कोरोनाबाबत जनजागृती केली.

नाशिक शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठिकठिकाणी आरोग्य तपासणी तसेच जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून याच पाशर््वभूमीवर नांदूरवैद्य येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदूरवैद्य येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. सरकारने कोरोनापासून बचावासाठी आवश्यक आरोग्य सुविधांची उपाययोजना केली असून लोकसहभागातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे बेलगाव कुर्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा शिंदे यांनी यावेळी जनजागृती करतांना सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तो रोखण्यासाठी आता शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली असून यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका हे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत. नांदूरवैद्य येथील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण गावात ट्रॅक्टरद्वारे जंतूनाशक औषधाची फवारणी ग्रामपंचायतीचे सरपझच अॅड चंद्रसेन रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच नितीन काजळे, सदस्य रवि काजळे, पोपटराव दिवटे, मनोहर काजळे आदींनी संपूर्ण गागावातून मंदिर परिसर तसेच मुख्य गल्ली चौक आदीं ठिकाणी फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.
(२६ नांदूरवैद्य २, ३)
नांदूरवैद्य येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत कुटुंबाची तपासणी करतांना आरोग्यसेविका मंगला कणसे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे, उपसरपंच नितीन काजळे, रवि काजळे. पोपटराव दिवटे व इतर.