मनमाडला भाजीबाजारात निर्जंतुकीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:09 PM2020-04-09T22:09:28+5:302020-04-09T23:16:34+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनमाड नगर परिषद प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत स्टेडियमच्या आवारात भरणाऱ्या भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटसमोर कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.
मनमाड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनमाड नगर परिषद प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत स्टेडियमच्या आवारात भरणाऱ्या भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटसमोर कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाºया-जाणाºया प्रत्येक नागरिकाला या कक्षामधूनच जावे लागते. त्यामुळे, त्यांच्यावर डेटॉलयुक्त औषधांची फवारणी होऊन त्यांचं सॅनिटाइझेशन होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूची लागण होण्यापासून या नागरिकांचा बचाव होण्यास मदत होणार आहे.
शहरातील डेली भाजी मार्केट हे शिवाजी चौक, भगतिसंग मैदान परिसरात भरत होते. मात्र, जागा अरु ंद असल्यामुळे येथे रोज मोठी गर्दी होत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दीमुळे होत असल्याने मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी भाजी मार्केट शहराच्या आययुडीपी भागात असलेल्या स्टेडियममध्ये स्थलांतर केले. स्टेडियमचा परिसर मोठा असल्याने येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे सोपे झाले. मात्र, तरी देखील भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठी होत आहे.