देवगाव येथे जंतुनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:38 PM2020-04-01T23:38:41+5:302020-04-01T23:39:10+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देवगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात औषध फवारणी करण्यात आली. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत.
देवगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देवगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात औषध फवारणी करण्यात आली. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत.
केंद्र व राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे. गावात कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात तसेच वाड्या-वस्त्यावंर हायड्रोजन पेरॉक्साइड औषध फवारणी करण्यात आली.
औषध फवारणीसाठी सरपंच संजय निलख, उपसरपंच विनोद जोशी, पोलीसपाटील सुनील बोचरे, सदस्य लहानू मेमाने, वसंत अढांगळे, जगदीश लोहारकर, रत्नाकर शिरसाठ, ग्रामसेविका के. बी. पगारे, प्रल्हाद गोसावी, अण्णा पवार, दीपक अढांगळे, चुन्ना काद्री, गोरख फापाळे, दिलीप उफाडे, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
पाच फवारणी यंत्रांद्वारे ५० लिटर औषध मिसळून पाच हजार लिटर औषधाची फवारणी करण्यात आली. अभिषेक मेमाने, किरण बोचरे, सौरभ लोहारकर, अमोल बोचरे, पंकज दगडे, या तरुणांनी याकामी पुढाकार घेत कोणतेही मानधन न घेता वाड्या-वस्त्यांवर तसेच सरकारी कार्यालये, दवाखाने, सार्वजनिक ठिकाणी फवारणी केली.