शिक्षकांना कोविड-१९ सेवेतून कार्यमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:16 PM2020-08-22T22:16:26+5:302020-08-23T00:20:26+5:30
नाशिक : कोविड-१९ या आजारासंबंधी सर्व्हे व इतर कामकाजासंदर्भात खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. परंतु खासगी प्राथमिक शिक्षकांना शाळा बंद असल्याने आॅनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागत आहे. जेथे आॅनलाइन नसेल तेथे आॅफलाइनसाठी वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगती-साठी शिक्षक प्रयत्न करीत असून, त्यांना शाळेत अथवा घरी राहून वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना प्रशासनाने तत्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे.

शिक्षकांना कोरोना सेवेतून कार्यमुक्त करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडे सातत्याने मागणी केल्यानंतर शासनाने १७-०८-२०२० रोजी शासन शासन निर्णयाद्वारे आदेश निर्गमित करून कोविड-१९ मध्ये अधिग्रहीत केलेल्या खासगी प्राथमिक शाळेतील/ जिल्ह्यातील शिक्षकांची सेवा शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ कार्यमुक्त करण्यास सांगितले आहे. याबाबत खाजगी प्राथमिक महासंघाच्या प्रतिनिधी मंडळाने निवेदननदूने शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली. यावेळी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नंदलाल धांडे, उपाध्यक्ष हरेकृष्ण सानप, कोव्हीड-१९ सेवेत कार्यरत शिक्षक उपस्थित होते.