नाशिक जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 11:20 AM2017-12-30T11:20:51+5:302017-12-30T11:21:33+5:30
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अखेर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.
नाशिक- भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अखेर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्टखाली कलम 88 आणि 83 अंतर्गत रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली. आजी-माजी अध्यक्षांसह एकूण 17 जणांवर दोषारोप आहेत.
जॉईंट रजिस्टर भालेराव यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. मागच्या काही महिन्यांपासून घोटाळयांमुळे संचालक मंडळावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.