उमराणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:58 AM2018-07-18T00:58:04+5:302018-07-18T00:58:35+5:30
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, पणन मंडळाच्या अभिप्रायावरून जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी ही कारवाई केली. सहायक निबंधक एस.पी. कांदळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, पणन मंडळाच्या अभिप्रायावरून जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी ही कारवाई केली. सहायक निबंधक एस.पी. कांदळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उमराणे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन विलास देवरे व खंडू देवरे यांच्या गटाची सत्ता स्थापन झाली होती. बाजार समितीच्या प्रथम सभापतिपदाचा मान विलास देवरे यांना मिळाला होता. देवरे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने राजेंद्र देवरे यांची सभापतिपदी वर्णी लागली होती. बाजार समितीच्या दैनंदिन व्यवहाराबाबत विरोधी संचालक प्रशांत देवरे यांनी शेतकरी हिताची बाजू लावत शासनाकडे शेतकऱ्यांचे शेतमाल विक्र ीची थकीत रक्कम, बाजार फी, देखरेख फी, परवाना नूतनीकरणविषयी लेखी तक्रार दिली होती. शेतकºयांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, लोकशाही दिन, शासन पोर्टलमार्फत तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक यांनी बाजार समिती प्रशासनाकडे याबाबत लेखी पत्राद्वारे विचारणा करून अहवाल मागवला होता. दोन-तीन वेळा कामकाज सुधारण्यासाठी बाजार समितीला संधी देण्यात आली होती. संचालक मंडळ, सचिव व प्रशांत देवरे यांच्या लेखी खुलाशानंतर जिल्हा उपनिबंधक यांनी कर्तव्य, अधिकार व जबाबदारी याबाबत असमर्थतेचा ठपका ठेवत संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली. संचालक प्रशांत देवरे यांनी वेळोवेळी लेखी तक्र ार व विरोध नोंदविल्याबद्दल आणि शिवाजी ठाकरे मयत झाल्याने त्यांना दोषी ठरविले नाही. उर्वरित संचालक मंडळासह सचिव यांना दोषी ठरवत संचालक मंडळ बरखास्त केले आहे.
४संचालक मंडळ बरखास्तीनंतर प्रशासक कांदळकर यांच्याकडे बाजार समितीचा कार्यभार देण्यात आला आहे. सचिव व उपसचिव अचानक रजेवर गेल्याने प्रशासकांना कार्यभार घेता आला नाही. प्रशासकांनी दिवसभर बॅँक कामाविषयी वेळ दिला. दरम्यान, बुधवारी (दि.१८) बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक एस.पी. कांदळकर हे रितसर कार्यभार सांभाळणार असून, संचालक मंडळ आपले पद वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतात की काय, याकडे बाजार समितीचे कार्यक्षेत्र असलेल्या उमराणेसह परिसरातील आठ गावांतील जनतेचे लक्ष लागून आहे.