नाशिकमध्ये तलावात विसर्जनाला विल्होळीकरांचा नकार

By श्याम बागुल | Published: September 13, 2018 03:25 PM2018-09-13T15:25:15+5:302018-09-13T15:28:12+5:30

गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज

Dismissal of Vilholika in the lake at Nashik | नाशिकमध्ये तलावात विसर्जनाला विल्होळीकरांचा नकार

नाशिकमध्ये तलावात विसर्जनाला विल्होळीकरांचा नकार

Next
ठळक मुद्देप्रदुषण टळेल : अनुचित घटनांना आळा बसेल विल्होळी तलावात विसर्जन बंदी कायम ठेवण्यावर ग्रामस्थांचे एकमत

नाशिक : गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाझर तलावातील पाणी दुषीत होण्याबरोबरच गत काही अनुचित घटनांचा विचार करता यंदाही विल्होळीच्या तलावात गणेश विसर्जन न करण्याचा व करू देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.
येथील हनुमान मंदिर येथे विल्होळी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली. गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे मागे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दोन ते तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सदर तलावातील गाळ, मुरूम काढण्यात आलेल्या असून तलावामध्ये ओबडधोबड स्वरूपाचे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तलावातील पाण्यामुळे या खड्ड्यांचा व खोलीचा अंदाज येत नाही. तसेच विसर्जन काळात मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने विल्होळी तलावात विसर्जन बंदी कायम ठेवण्यावर ग्रामस्थांचे एकमत झाले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंत मोहिते यांनी गावक-यांना मार्गदर्शान केले. महामार्गावर असलेले विल्होळी गाव संवेदनशील असल्याचे समजले होते. परंतु गावातील एकोपा पाहिल्यावर कायदा व सुव्यवस्था राखणारे गाव असल्याचे जाणवले. गावात एकोपा नांदूण गुन्हे कमी कसे होतील यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. तालुका पोलीस ठाण्यापासून विल्होळी गाव दूर असले तरी, ग्रामस्थांनी अडचणीच्या काळात भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा त्यांना प्रतिसाद दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी विल्होळी सरपंच बाजीराव गायकवाड ,उपसरपंच श्री कृष्ण मते, सदस्य सोमनाथ भावनाथ, माजी पंचायत समिती उपसभापती सुजाता रुपवते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष देवरे, पोलीस पाटील संजय चव्हाण, मनोहर भावनाथ, मोतीराम भावनाथ उपस्थित होते.
(फोटो आहे आरवर १३ विल्होळी नावाने)

 

Web Title: Dismissal of Vilholika in the lake at Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.