वाकी-खापरी धरणातून दुसऱ्या दिवशीही विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:11 AM2019-08-03T01:11:40+5:302019-08-03T01:12:36+5:30
इगतपुरी तालुक्यात घोटीपासून काही अंतरावर असलेल्या असलेल्या वाकी-खापरी धरणातून सलग दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणात सद्यस्थितीत ८६ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे.
नाशिक : इगतपुरी तालुक्यात घोटीपासून काही अंतरावर असलेल्या असलेल्या वाकी-खापरी धरणातून सलग दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणात सद्यस्थितीत ८६ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी सुमारे १९० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. बुधवारी १२५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
मराठवाड्याच्या सिंचनाची आवश्यकता लक्षात घेऊन घोटीपासून जवळच कुर्नोली गावाजवळ दोन हजार ६८० दलघफू क्षमतेचे धरण बांधण्यात आले आहे. सन २०१७ मध्ये या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले असल्यामुळे गेल्यावर्षी केवळ चाचणी म्हणून धरणात सुमारे ८८ टक्केपाणीसाठा प्रायोगिक तत्त्वावर ठेवण्यात आला होता. मागीलवर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे आणि धरणक्षेत्रात पुरेसा पाऊसही नसल्यामुळे साठवलेले पाणी कायम ठेवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. यंदा पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यात आला आहे. धरण जवळपास ८६ टक्के भरले असले तरी दुसरीकडे पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होताना दिसते. वाकी-खापरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्यामुळे विसर्ग अधिक वाढविला जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी पेक्षा यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे आॅगस्टच्या सुरुवातीलाच विक्रमी पावसाची नोंद झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. या धरणाच्या पाण्यावर १.१५ मेगावॉटचा वीजप्रकल्प तयार होणार असून, खासगीकरणातून हा प्रकल्प चालणार आहे. यासाठीची सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, औरंगाबाद येथील एका कंपनीकडून वीजनिर्मिती हाती घेतली जाणार आहे.