मंजुरी मिळूनही बांधकाम होत नसल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 05:51 PM2018-08-23T17:51:53+5:302018-08-23T17:52:03+5:30
लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन केंद्राचे बांधकाम मंजूर होऊनही प्रत्यक्षात बांधकाम होत नसल्याने या सुविधेअभावी लासलगाव परिसरातील मृतदेह निफाड येथे न्यावे लागत आहेत. शासकीय अनास्थेमुळे मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्यावे लागतात. त्यात पैसा आणि होणारा वेळ यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यास विलंब होतो.
लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन केंद्राचे बांधकाम मंजूर होऊनही प्रत्यक्षात बांधकाम होत नसल्याने या सुविधेअभावी लासलगाव परिसरातील मृतदेह निफाड येथे न्यावे लागत आहेत. शासकीय अनास्थेमुळे मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्यावे लागतात. त्यात पैसा आणि होणारा वेळ यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यास विलंब होतो.
आमदार छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात असलेल्या या ग्रामीण रुग्णालय परिसरात होणारी कामे शासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे रखडली. त्याची माहिती समजताच या अधिकाऱ्यांना नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सूचना दिल्याचे समजते.
लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मुबलक जागा पाहता परिसरात पोस्टमार्टेम रूम तसेच वैद्यकीय अधिकारी व चतुर्थ श्रेणी कामगार यांचे निवासस्थान बांधकाम करण्यास मुबलक जागा आहे. याबरोबरच लासलगाव येथील नळ पाणी योजनेचे पाणी साठविण्यासाठी जलकुंभ या विविध बांधकामे करण्यासाठी लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने किमान दीड डझन पत्रे पाठविली गेली.
या रुग्णालयाच्या परिसरात सुंदर बाग तयार करण्यात आली आहे तसेच बगीच्यात लहान मुलांना खेळायला खेळणीदेखील आहेत.
येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.व्ही. सूर्यवंशी यांच्यासह सहकारी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना तपासून आंतररुग्ण सेवाही दिली जाते. लासलगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर एकांतात हे रुग्णालय असले तरी आकस्मिक मृत्यू तसेच अपघात व दुर्घटना घडली तर पोलीस सोपस्कारानंतर लासलगाव परिसरातील मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्यावे लागतात. तातडीने शवविच्छेदन केंद्र काम होण्याची गरज आहे.
लासलगावपासून दोन किलोमीटर अंतरावर हे रु ग्णालय असून, दहा ते अकरा शिपाई व इतर कर्मचारी, एक वैद्यकीय अधिकारी, सहायक अधिकारी निवास स्थान, कार्यालय अधिकारी यांची निवासस्थाने या बांधकामाची निकड आहे. या रुग्णालयात कर्मचारी यांच्या पदाची मंजुरी असून, फक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्त आहे, तसेच एमएसईबी पॅनल जळालेले आहे.
............
लासलगाव परिसरात मृतदेहाचे पोस्टमार्टेम रूम होणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु शासकीय अधिकारी का दुर्लक्ष करीत आहे?
- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर (२३लासलगावहोळकर)