बंदमुळे शाळा लवकर सोडल्या; विद्यार्थी वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:37 AM2018-07-26T00:37:32+5:302018-07-26T00:37:45+5:30
: मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम पंचवटी परिसरात दिसला. पंचवटीतील काही शाळांनी नियमित वेळेपेक्षा विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडले तर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी वाहनचालकांनी विद्यार्थी वाहतूक न केल्याने पालकांना विद्यार्थ्यांची ने-आण करावी लागल्याचे चित्र दिसून आले.
पंचवटी : मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम पंचवटी परिसरात दिसला. पंचवटीतील काही शाळांनी नियमित वेळेपेक्षा विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडले तर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी वाहनचालकांनी विद्यार्थी वाहतूक न केल्याने पालकांना विद्यार्थ्यांची ने-आण करावी लागल्याचे चित्र दिसून आले. बंदमुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागली. बुधवारी सकाळी खासगी विद्यार्थी वाहतूक करणाºया स्कूलचालकांनी मराठा क्र ांती मोर्चामुळे विद्यार्थी वाहतूक बंद असल्याचे सांगितल्याने पालकांना सकाळी आपल्या पाल्यांना शाळेपर्यंत नेऊन सोडावे लागले तर शाळाचालकांनीही सकाळी दहा वाजेला शाळा सोडून दिल्या. एरवी स्कूल बस तसेच विद्यार्थी वाहतूक करणाºया व्हॅनमुळे गजबजणारा शालेय परिसर ओस पडला होता. विद्यार्थी वाहतूक करणाºया शिक्षण संस्थांनीही विद्यार्थी वाहतूक बंद केली होती. बुधवारच्या दिवशी मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आल्याने विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनचालकांनी विद्यार्थी वाहतूक बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अनेक पालकांना आपापल्या पाल्यांना शाळेत नेऊन सोडावे लागले.