एकीचा प्रेमभंग : जुन्या नाशकात दोघा मुलींची एकचा दिवशी आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:44 PM2019-02-04T17:44:24+5:302019-02-04T17:48:19+5:30

या दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचा प्रकार एकसारखा असून, तरुणीच्या आत्महत्येचे कारण पुढे आले असले तरी अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Disobedience of one: Two girls commit suicide in one old day | एकीचा प्रेमभंग : जुन्या नाशकात दोघा मुलींची एकचा दिवशी आत्महत्त्या

एकीचा प्रेमभंग : जुन्या नाशकात दोघा मुलींची एकचा दिवशी आत्महत्त्या

Next
ठळक मुद्देअल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून चिठ्ठी शोधली आहे

नाशिक : जुने नाशिक परिसरात एका अल्पवयीन मुलीने अज्ञात कारणातून गळफास घेतला तर दुसऱ्या तरुणीने प्रेमभंग झाल्याचे कारण चिठ्ठीत लिहून राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या धक्कादायक दोन घटना जुने नाशिक भागात एकाच दिवशी घडल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचा दोन महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता. याबाबत भद्रकाली पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.
भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजना कोंडीराम हरगावकर (१७ रा. कोळीवाडा, ५४ क्वॉर्टर) या अल्पवयीन मुलीने रविवारी (दि.३) दुपारच्या सुमारास घरी कोणी नसताना गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, वडील कोंडीराम हरगावकर यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ संजनाला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी स्पष्ट केले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजनाचा दोन महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता, असे समजते.
दुसºया घटनेत कथडा भागातील कोळीवाडा येथे राहणारी तरुणी प्रियंका राजू पवार (१८) हिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत प्रेमभंग हे आत्महत्येचे कारण आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून चिठ्ठी शोधली आहे. प्रियंकाचे वडील राजू पवार हे काल सकाळी कामानिमित्त सय्यद पिंप्री येथे गेले होते. यावेळी तिने गळफास घेतल्याची माहिती चुलत भाऊ सोमनाथ पवार याने राजू पवार यांना फोनवरून दिल्यानंतर ते घरी आले असता प्रियंकाने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी एक डायरी व मोबाइल ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू केला आहे. या दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचा प्रकार एकसारखा असून, तरुणीच्या आत्महत्येचे कारण पुढे आले असले तरी अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

विवाहितेची आत्महत्या
पाथर्डी फाटा परिसरात राहणा-या कविता विजय पाटील (३५, रा. श्रीजी रो-हाउस) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. यावेळी त्यांचे पती विजय पाटील खालच्या खोलीत झोपलेले होते. दरम्यान, पाटील यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

Web Title: Disobedience of one: Two girls commit suicide in one old day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.