शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 01:16 AM2019-12-21T01:16:50+5:302019-12-21T01:17:39+5:30
लहवितच्या बाजगिरा भागात शेताच्या वादातून दोघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग करत पीडितेचा पती व सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसले कुटुंबीयांवर देवळाली पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : लहवितच्या बाजगिरा भागात शेताच्या वादातून दोघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग करत पीडितेचा पती व सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसले कुटुंबीयांवर देवळाली पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अविनाश तानाजी भोसले, तानाजी भोसले, मंगला भोसले, आदिती भोसले, प्रियंका भोसले यांनी बुधवारी (दि.१८) दुपारी पीडितेच्या शेतामध्ये रोटर मारण्याचे काम सुरू असताना, संशयित अविनाश भोसले याने ट्रॅक्टरला आडवे होत काम रोखले.
संशयित तानाजी भोसले याने पीडितेचा हात धरून बाजूला ओढले आणि दोघांनी पीडितेसोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर संशयित या दोघांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत पीडितेचा पती व सासºयास बेदम मारहाण करत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संशयितांनी यावेळी ‘जीव गेला तरी चालेल, जमीन देणार नाही, पोलिसांकडे तक्र ार केली तर मोठा पिक्चर दाखवेल’अशी धमक ीदेखील पीडितेला दिली. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक गिते हे करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
नाशिकरोड : जुन्या चेहेडी शिवरोडवरील गाडेकर मळा परिसरात राहणाºया एका संशयिताने येथील विवाहितेला ‘तुझ्या मुलाला उचलून नेले आहे...’ असे खोटे सांगून विवाहितेला एका लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिन्नर फाटा परिसरात एका अपार्टमेंटमध्ये अमरावती जिल्ह्यातील पीडित महिला साफसफाईचे काम करते. त्याच सोसायटीमधील सुपरवायझर संशयित राज बैंद उर्फ अनिल मंगुराम बैंद (३७, रा. गौतमनगर, गोरेवाडी) याने त्या महिला सफाई कामगारास तुझ्या मुलाला उचलून नेले असल्याचे सांगत बिटको चौकातील एका लॉजमध्ये नेऊन तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.