स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त

By Admin | Published: May 25, 2017 01:55 AM2017-05-25T01:55:42+5:302017-05-25T01:55:59+5:30

नाशिक : उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या कॉलेजरोड परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर बुधवारी (दि़ २४) पोलिसांनी छापा टाकला़

Dispatch in the center of the spa center destroyed | स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त

स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या कॉलेजरोड परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर बुधवारी (दि़ २४) पोलिसांनी छापा टाकला़ यां ठिकाणाहून आठ मुली व पाच मुले अशा १३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे यापूर्वीदेखील या स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली होती; मात्र पुन्हा या स्पा सेेंटरच्याआड देहविक्री सुरू झाल्याने परिसरात चर्चेचा विषय आहे़  हॉलमार्क चौकातील एस. के. ओपन मॉलमध्ये हे स्पा सेंटर सुरू होते़ पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांनी ‘एक्झोटिक’ स्पा सेंटरवर छापा टाकला़ या सेंटरमधून सात मुली व पाच मुलांना ताब्यात घेण्यात आले़ तर स्पा सेंटरचा मालक संशयित परेश सुराणा हा फरार झाला असून, त्याच्यावर पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शहरातील कॉलेजरोड परिसर हायप्रोफाइल म्हणून ओळखला जातो. या परिसरात ठिकाणी विविध मॉल्स, सिनेमागृह, महाविद्यालये आहेत. या परिसरात काही दिवसांपासून मोठ्या संख्येने स्पा सेंटर सुरू आहेत. कॉलेजरोड, गंगापूररोड, विसे मळा, येवलेकर मळा आदी भागांमध्ये स्पा सेंटरचे जाळे वाढत असून, यामध्ये देहविक्रय केला जात असल्याचे पोलीस कारवाईमधून अनेकदा समोर आले आहे़ मात्र, हे स्पा सेंटर पुन्हा सुरू होत असल्याने यावर कोणाची कृपादृष्टी आहे त्याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले़ दरम्यान, कॉलेजरोड परिसरात अनेक अनैतिक व्यवसाय सुरू असल्याने कारवाईची मागणी होत आहे.


 

Web Title: Dispatch in the center of the spa center destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.