चुंचाळे शिवारात लवकरच सुरू होणार दवाखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:36 AM2018-11-18T00:36:19+5:302018-11-18T00:36:32+5:30

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना अभियानाअंतर्गत अंबड येथील चुंचाळे शिवारात अल्प उत्पन्न गटातील रहिवासीयांसाठी हक्काचे घर देण्यात आले असले तरी या घरकुलात राहण्या आधीच घरघर लागली असून, घरकुलात राहण्यासाठी आलेल्या रहिवाशांना दवाखान्याची सोयी नसल्याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून, त्यानुसार मनुष्यबळ उपलब्ध करून लवकरच दवाखाना सुरू करण्यात येणार आहे तर येथील खडीच्या रस्त्याचे डांबरीकर करण्यासाठी प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत.

Dispensary to start soon | चुंचाळे शिवारात लवकरच सुरू होणार दवाखाना

चुंचाळे शिवारात लवकरच सुरू होणार दवाखाना

Next

सिडको : जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना अभियानाअंतर्गत अंबड येथील चुंचाळे शिवारात अल्प उत्पन्न गटातील रहिवासीयांसाठी हक्काचे घर देण्यात आले असले तरी या घरकुलात राहण्या आधीच घरघर लागली असून, घरकुलात राहण्यासाठी आलेल्या रहिवाशांना दवाखान्याची सोयी नसल्याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून, त्यानुसार मनुष्यबळ उपलब्ध करून लवकरच दवाखाना सुरू करण्यात येणार आहे तर येथील खडीच्या रस्त्याचे डांबरीकर करण्यासाठी प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत.
चुंचाळे येथे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच भाजीमार्केटसाठी जागा आहे, परंतु बाजारच भरत नाही. यासंह अनेक सुविधा येथील रहिवाशांना देण्यात आलेल्या नसल्याबाबत तसेच दवाखाना व रस्त्यांची दयनीय अवस्थेबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर महापालिकेकेला जाग आली व त्यांनी याठिकाणी सुविधा देण्यासाठी कार्यवाही सुरू केली असल्याचे सांगण्यात आले आहे. याठिकाणी बंद अवस्थेत असलेल्या दवाखान्यासाठी सध्या डॉक्टर आणि परिचारिकांची भरती करण्यात येत असून, मनुष्यबळ पुरवल्यानंतर कामाला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर भाजी बाजार सुरू करण्यासाठी कारवाई करण्यात येत असून रस्ता डांबरीकणासाठी निविदा मागवण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Dispensary to start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.