वादविवाद स्पर्धा बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:58 AM2019-12-11T00:58:48+5:302019-12-11T01:00:20+5:30

‘पोलीस रेझिंग डे’निमित्त पोलीस दलाच्या वतीने नाशिक परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधून १३ महाविद्यालयांतील एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 Dispensing Contribution Prize Distribution | वादविवाद स्पर्धा बक्षीस वितरण

वादविवाद स्पर्धा बक्षीस वितरण

Next

नाशिक : ‘पोलीस रेझिंग डे’निमित्त पोलीस दलाच्या वतीने नाशिक परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधून १३ महाविद्यालयांतील एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या अक्षदा देशपांडे व अहमदनगरच्या अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाच्या वैष्णवी जाधव यांनी परीक्षकांसह पोलीस अधिकाऱ्यांची मने जिंकत राज्यस्तरीय संघात स्थान पटकाविले.
गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.१०) वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अंमली पदार्थांचा गैरवापर रोखण्याकरिता कायद्याची अंमलबजावणी करणाºया संस्थांऐवजी पालक व समाजाची भूमिका आहे किंवा नाही?
असा विषय देण्यात आला  होता.
परिक्षेत्रातील पोलीस आयुक्तालय, अधीक्षक कार्यालय ग्रामीण, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील महाविद्यालयांना निमंत्रित करण्यात आले होते. वक्तृत्वावर प्रभुत्व असलेल्या इयत्ता कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या आंतरजिल्हा वादविवाद स्पर्धेत सहभागाची संधी देण्यात आली होती. डॉ. गुंजन कुलकर्णी, मानसशास्त्र तज्ज्ञ मृणाल भारद्वाज यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.
बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. त्याअनुषंगाने पोलीस दलातर्फे विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत असून, याची सुरुवात वादविवाद स्पर्धेपासून झाल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास प्रतिसाद लाभला.

Web Title:  Dispensing Contribution Prize Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.