कृष्णमूर्ती यांच्या साहित्याचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:09 AM2018-12-15T01:09:53+5:302018-12-15T01:10:09+5:30

प्रख्यात तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांच्या समग्र विचारांवर आधारित चित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१४) प्रारंभ झाला. सदरचे शिबिर हे रविवारपर्यंत (दि.१६) खुले असणार आहे.

Display of Krishnamurti's literature | कृष्णमूर्ती यांच्या साहित्याचे प्रदर्शन

कृष्णमूर्ती यांच्या साहित्याचे प्रदर्शन

Next

नाशिक : प्रख्यात तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांच्या समग्र विचारांवर आधारित चित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१४) प्रारंभ झाला. सदरचे शिबिर हे रविवारपर्यंत (दि.१६) खुले असणार आहे.
कुसुमाग्रज स्मारकात आयोजित या शिबिरात जे कृष्णमूर्ती यांचे विचार तत्त्व तसेच भाष्य हे युवापिढीला ज्ञात व्हावे यासाठी भरविण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांची दुर्मिळ छायाचित्रेदेखील प्रदर्शनात आहेत. मानवाच्या वृत्ती, मानसिक आणि भावनिक आंदोलने समजावून घेऊन सम्यक जीवन कसे जगता येईल, यावर कृष्णमूर्तींनी केलेले भाष्य तसेच त्याला अनुरूप छायाचित्रे असे प्रदर्शनाचे वैशिष्ट असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृष्णमूर्ती अभ्यासक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Display of Krishnamurti's literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.