उद्ध्वस्त ‘गोदापार्क’मुळे राज उद्विग्न

By admin | Published: August 4, 2016 01:29 AM2016-08-04T01:29:30+5:302016-08-04T01:29:39+5:30

पूर परिस्थितीची पाहणी : माध्यमांशी टाळला संवाद

The displeased 'Godpark' provoked the excitement of the king | उद्ध्वस्त ‘गोदापार्क’मुळे राज उद्विग्न

उद्ध्वस्त ‘गोदापार्क’मुळे राज उद्विग्न

Next

नाशिक : सुमारे एक तपापासून ऊराशी बाळगलेला ‘गोदापार्क’ हा स्वप्नवत प्रकल्प मंगळवारी आलेल्या महापुराने उद्ध्वस्त झाल्याचे पाहून मनसे प्रमुख राज ठाकरे अस्वस्थ झाले. उद्विग्न झालेल्या राज यांनी नंतर नियोजित पत्रकार परिषदही रद्द करत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद करणे टाळले.मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक शहराचे जनजीवन पूर्णत: कोलमडले. १९६९ नंतर पहिल्यांदा गोदावरीने रौद्र रूप धारण केल्याने नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला. बुधवारी पूर ओसरल्यानंतर आणि पावसानेही अधूनमधून विश्रांती दिल्याने जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर आले. शहर मंगळवारच्या धक्क्यातून सावरत असतानाच बुधवारी सायंकाळी ५ वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नाशिकला आगमन झाले. गोल्फ क्लब विश्रामगृह येथे महापौर अशोक मुर्तडक यांनी राज यांचे स्वागत केले.

Web Title: The displeased 'Godpark' provoked the excitement of the king

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.