सटाणा लोकन्यायालयात १०५ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 08:23 PM2020-12-15T20:23:51+5:302020-12-16T00:49:31+5:30
सटाणा : महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये तालुका विधि सेवा समिती व सटाणा वकील संघ सटाणा तालुका बागलाण यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात १०५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, तर तडजोडीतून ९४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
शनिवारी दिवाणी व फौजदारी न्यायालय सटाणा आवारात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयाचे उद्घाटन तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश विक्रम आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. सहदिवाणी न्यायाधीश आसीफ तांबोळी, जिल्हा वकील फेडरेशनचे व सटाणा वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे, सटाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन देशमुख तसेच बँक ऑफ बडोदाचे रिजनल मॅनेजर प्रदीप चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लोकन्यायालयात एकूण १०५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन सुमारे ९४ लाख रुपये रकमेची वसुली करण्यात आली. लोकन्यायालय यशस्वी करण्याकामी सटाणा वकील संघाचे सर्व वकील व न्यायालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.