सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:57 PM2017-08-21T23:57:55+5:302017-08-22T00:38:06+5:30

कामाच्या नव्हे तर स्वत:च्या सोयीने आपली नेमणूक करून घेण्याची उदाहरणे काही कमी नाहीत. महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्याही सोयीच्या नियुक्त्यांबाबतीत सभागृहात सदस्यांकडून वारंवार ओरड केली जात असते. सफाई कर्मचाºयांच्या या असमतोल वाटपाबाबतचे वास्तव आरोग्य विभागानेच एका सदस्याने विचारलेल्या लेखी प्रश्नाद्वारे उलगडविले आहे.

 Disposal of cleanliness personnel | सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप

सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप

Next

नाशिक : कामाच्या नव्हे तर स्वत:च्या सोयीने आपली नेमणूक करून घेण्याची उदाहरणे काही कमी नाहीत. महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्याही सोयीच्या नियुक्त्यांबाबतीत सभागृहात सदस्यांकडून वारंवार ओरड केली जात असते. सफाई कर्मचाºयांच्या या असमतोल वाटपाबाबतचे वास्तव आरोग्य विभागानेच एका सदस्याने विचारलेल्या लेखी प्रश्नाद्वारे उलगडविले आहे. जुन्या नाशिकमधील प्रभाग क्रमांक १३ आणि १४ हा दाट लोकवस्तीचा भाग असला तरी याठिकाणी तब्बल ३३१ सफाई कर्मचारी कार्यरत असून, डीजीपीनगर, मुरारीनगर आदी भाग असलेल्या प्रभाग क्रमांक २८ मध्ये अवघे ६ सफाई कर्मचारी नियुक्त केल्याचे समोर आले आहे. गेल्या शनिवारी (दि.१९) झालेल्या महासभेत हेमलता कांडेकर यांनी शहरातील सफाई कर्मचाºयांसंबंधी माहिती विचारलेली होती. त्यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत सफाई कर्मचाºयांच्या असमतोल नियोजनाचे वास्तव समोर आले आहे. महापालिकेत सफाई कर्मचाºयांची संख्या १९९३ असली तरी त्यातील २६२ कर्मचारी हे प्रशासनाच्या कामाच्या सोयीने प्रत्यक्ष रस्त्यावर काम न करता विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वाधिक १८८ कर्मचारी कार्यरत आहेत तर सर्वात कमी अवघे ६ कर्मचारी प्रभाग २८ मध्ये कार्यरत आहेत. जुन्या नाशिकमधीलच प्रभाग क्रमांक १४ मध्ये १४३ कर्मचारी नियुक्त आहेत. दोन्ही प्रभागात दाट लोकवस्ती असली तरी कर्मचाºयांची संख्या ३३१ इतकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संख्या असली तरी जुने नाशिक परिसरात स्वच्छतेबाबतची ओरड काही थांबलेली नाही. या दोन्ही प्रभागातच अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट कायम आहेत. त्यात कसलीही सुधारणा झालेली नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रभागांमध्ये २० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही मागील महिन्यात आरोग्याधिकाºयांनी हजेरी शेडवर दिलेल्या अचानक भेटीत अनेक कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर नसल्याचे निदर्शनास आले होते. नवीन प्रभाग झाल्याने सफाई कर्मचाºयांचे प्रभागनिहाय समान वाटप करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. महापौरांनीही त्याबाबतचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. परंतु, आरोग्य विभागानेच दिलेल्या ताज्या माहितीनुसार, अद्यापही समान वाटप झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Web Title:  Disposal of cleanliness personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.