डेबिट कार्डचा गैरवापर करून पैशांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:19 AM2018-03-10T00:19:25+5:302018-03-10T00:19:25+5:30

नाशिक : डेबिट कार्डचा गैरवापर करून सीडीएम मशीनमधून दोघांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस मुख्य शाखेजवळील एटीएममध्ये घडला आहे़

Disposal of money by misusing the debit card | डेबिट कार्डचा गैरवापर करून पैशांचा अपहार

डेबिट कार्डचा गैरवापर करून पैशांचा अपहार

Next
ठळक मुद्देडेबिट कार्डचा गैरवापर करून २० हजार रुपये काढून घेतले़भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

नाशिक : डेबिट कार्डचा गैरवापर करून सीडीएम मशीनमधून दोघांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस मुख्य शाखेजवळील एटीएममध्ये घडला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ म्हसरूळमधील कृष्णा व्हॅलीतील रहिवासी गिरीश कुकरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ व ६ मार्च रोजी सीबीएसजवळील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेतील चालू बँक खाते क्रमांक ३५३२४०३७५५८ यामधून अज्ञात संशयिताने कुकरेजा यांच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून २० हजार रुपये काढून घेतले़ ही बाब कुकरेजा यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ दुसरी फसवणुकीची घटना याच दिवशी याच ठिकाणी घडली़ सिन्नर तालुक्यातील दोडी खुर्द येथील रहिवासी भारत साबळे यांच्या बचत खात्यातून ३४४३२८७६४४० मधून डेबिट कार्डचा उपयोग न करता संशयिताने ५ व ६ मार्च रोजी सीबीएसजवळील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेतील सीडीएम मशीनमधून परस्पर १४ हजार ५०० रुपये काढून घेतले़ या प्रकरणी साबळे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़

Web Title: Disposal of money by misusing the debit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा