आऊटसोर्सिंग ठेक्यातील अनामत प्रकरणी याचिका निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:43 PM2021-02-18T23:43:15+5:302021-02-19T01:21:45+5:30
नाशिक- शहरातील सफाईसाठी नियुक्त केलेल्या सातशे सफाई कामगारांकडून वॉटर ग्रेस कंपनीने पंधरा हजार रूपयांची सुरक्षा अनामत रक्कम घेतली असली ती ते परत देणार आहेत, असे स्पष्ट करीत यासंदर्भात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
नाशिक- शहरातील सफाईसाठी नियुक्त केलेल्या सातशे सफाई कामगारांकडून वॉटर ग्रेस कंपनीने पंधरा हजार रूपयांची सुरक्षा अनामत रक्कम घेतली असली ती ते परत देणार आहेत, असे स्पष्ट करीत यासंदर्भात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
शहर स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची संख्या कमी पडत असल्याने महापालिकेने आऊटसोर्सिंगने सफाईचा ठेका दिला आहे. वॉटर ग्रेस या कंपनीने सातशे कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. या कंपनीने सफाई कामगार नियुक्त करताना प्रत्येकी पंधरा हजार रूपये घेतल्याच्या तक्रारी होत्या. महापालिकेच्या महासभा, स्थायी समिती आणि अन्य समित्यांमध्ये हा विषय गाजला होता.
यासंदर्भात मनसेचे कार्यकर्ते संदीप भंवर यांनी उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने कंपनीला पंधरा हजार रूपयांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यात उमेदवारांकडून घेण्यात येणारे पंधरा हजार रूपये ही अनामत रक्कम आहे. या रकमेतून कामगारांना गणवेश, जीपीएस, झाडू, स्वच्छता साधने आणि व्हील बरोज देण्यात येणार आहे.
कोणी कामगाराने नोकरी सोडली तर दिलेल्या वस्तु परत घेऊन त्यांची सुरक्षा अनामत रक्कम परत घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी (दि.१७) उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. वॉटरग्रेसच्या वतीने ॲड. रामपाल कोहली, मिलींद साठे यांनी काम बघितले.