धक्का लागल्याने वाद; मालेगावी एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:21 AM2019-01-28T01:21:53+5:302019-01-28T01:22:14+5:30
येथील जाजूवाडी भागात रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्कूटीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याने चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात आरोपी समाधान दादाजी धिवरे रा. हिंमतनगर याचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगाव : येथील जाजूवाडी भागात रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्कूटीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याने चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात आरोपी समाधान दादाजी धिवरे रा. हिंमतनगर याचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शत्रुघ्न प्रकाश गायकवाड (३०) रा. जाजूवाडी महादेव मंदिराजवळ यांनी फिर्याद दिली.
रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शत्रुघ्न गायकवाड याचे वडील प्रकाश काशीनाथ गायकवाड (५५) रा. जाजूवाडी महादेव मंदिराजवळ हे वैतागवाडीकडून कॅम्पकडे स्मशानभूमीजवळून जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याने त्यांच्या मॅस्ट्रो स्कूटी क्रमांक एमएच ४१ एएच ४३२९ वरुन जात होते. यावेळी समाधान दादाजी हिरे यास धक्का लागला. त्यावरुन वाद झाल्याने आरोपीने फिर्यादीचे वडील प्रकाश गायकवाड यांना मारहाण करून त्याच्या खिशातील चाकूने वार करून जीवे ठार मारले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत हगवणे, शशिकांत शिंदे यांनी भेट दिली. वडनेर खाकुर्डी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक मोताळे करीत आहेत.