वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये वाद
By admin | Published: March 12, 2016 11:11 PM2016-03-12T23:11:06+5:302016-03-12T23:20:56+5:30
सौंदाणे : अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे वीज कक्षात वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तूतू मै मै होऊन बाचाबाची झाली. या प्रकाराची दोघांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या वीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वर्कस फेडरेशनने केली आहे.
तालुक्यातील सौंदाणे कक्ष २ कार्यालयात वीज कर्मचारी सुभाष शिंदे व सहाय्यक अभियंता बिरारी यांच्यात हुज्जत झाली. शिंदे वीज वसुलीचे कामे करून आल्यावर बिरारी यांनी त्यांना विचारणा केल्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन प्रकरण हमरीतुमरीवर आले. हा प्रकार सुभाष शिंदे यांनी संघटनेच्या
पदाधिकारींना कथन केला. यामुळे इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने याबाबत विचारणा केली व मोतीभवन कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कक्ष २ चे अधिकारी बिरारी यांच्या मनमानी व दंडेलशाहीवर कारवाईची मागणी करत वरिष्ठांना निवेदन दिले.
या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या कामांवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात
आला आहे. धरणे आंदोलनात संघटनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यासह सदस्य व वीज कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)