आठवडे बाजार हटविताना वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:34 AM2018-07-18T01:34:21+5:302018-07-18T01:34:36+5:30
आडगाव : कोणार्कनगर येथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांनी उधळून लावल्याने विक्रेत्यांच्या विरोधामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रेत्यांचा विरोध पाहता पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समजते. दरम्यान, सदर बाजाराबाबत तक्रारी वाढल्याने कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे म्हणणे आहे.

येथील आठवडे बाजाराबाबत स्थानिकांनी तक्रारी केल्यामुळे बाजार हटविण्यात आला असून अनेकांचा माल जप्त करण्यात आला. यामुळे विक्रेत्यांची धावपळ आणि पथकाची कारवाई यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून कोणार्क नगर आठवडे बाजार विविध प्रकारच्या वादात सापडला असून, रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे रहिवाश्यांना अडथळा होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही पूर्व सूचना न देता मनपा अतिक्रमण विभाग पथकाने मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात कोणार्क नगर आठवडे बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई केली.
प्रशासनाने बाजार बंद करण्याचे आदेश विक्रेत्यांना दिल्यानंतर विक्रेत्यांमध्ये व मनपा कर्मचाºयांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे कारवाईत अडथळा निर्माण करणाºयांवर पोलिसांनी लाठीमार केला. पाऊस व गोदावरीला आलेल्या पुरामुळे बाजारात भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी होती, पण अतिक्रमण पथकाच्या कारवाईमुळे विक्रेत्यांना व भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागले.