मनसेच्या आंदोलनामुळे ‘राजगडा’वर वाद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 09:49 PM2020-07-18T21:49:40+5:302020-07-19T00:40:40+5:30

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग वाढत असून, त्यातच आता राजकारणदेखील सुरू झाले आहे. मनसेच्या युवा नेत्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट दिले खरे, परंतु भाजपपेक्षा मनसेच्या नेत्यांनाच हा विषय अधिक बोचला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) राजगडावर चांगलीच खडखड झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता आंदोलने करायची किंवा नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडल्याचे समजते.

Dispute over 'Rajgad' due to MNS agitation? | मनसेच्या आंदोलनामुळे ‘राजगडा’वर वाद?

मनसेच्या आंदोलनामुळे ‘राजगडा’वर वाद?

googlenewsNext

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग वाढत असून, त्यातच आता राजकारणदेखील सुरू झाले आहे. मनसेच्या युवा नेत्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट दिले खरे, परंतु भाजपपेक्षा मनसेच्या नेत्यांनाच हा विषय अधिक बोचला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) राजगडावर चांगलीच खडखड झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता आंदोलने करायची किंवा नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडल्याचे समजते.
शहरात कोरोना उद्रेक झाल्याने सध्या नागरिक भयभीत आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने मनसेने महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट दिले. त्यामुळे आंदोलन चर्चेत ठरले असले तरी पक्षातील ज्येष्ठांना विशेषत: काही नगरसेवकांना ते रुचलेले नाही. शुक्रवारी (दि.१७) राजगडावर आलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने तर आंदोलकांनाच अशी आंदोलने असतात का? वगैरे प्रश्न करून सुनावल्याचे समजते. दीड वर्षावर महापालिका निवडणुका आल्या असून, त्यामुळे आता पक्ष काहीतरी हालचाली सुरू करत असताना पक्षाचे नेते खो घालत असल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे समजते.
मनसे आंदोलनामुळेच मोठी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत आंदोलने थंडावली आहेत. विशेषत: पक्षातील काही मोजके नेते पक्ष हाताळीत असल्याने कुठेही आंदोलन करताना नेत्यांना पूर्वकल्पना दिली नाही तर त्यांची नाराजी ओेढून घ्यावी लागते, अशी चर्चा आहे.
------------------
भविष्यातील निवडणुकीची चिंता
मनसेचे नेते मुळातच आक्रमक राहिलेले नाहीत. नगरसेवकांचा तर आंदोलनात सहभाग नव्हताच परंतु त्यांची आंदोलनाची मानसिकता नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अशीच अवस्था राहिल्यास दीड वर्षांनी होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीत पक्ष कसा सामोरे जाणार? असा प्रश्न कार्यकर्ते करीत आहेत.
---------------
कोंडीची चर्चा
अनेकांना पक्षात राहून काम करता येत नाही तर कोंडी होते. त्यातून काहीजण पक्षांतून बाहेरदेखील गेले आहेत. परंतु पक्षाची सूत्रे हाताळणाऱ्यांना त्याबद्दल काहीच वाटत नसल्याचे सांगितले जाते. विशेषत: महापालिका आणि स्मार्ट सिटीसंदर्भात आंदोलने करण्याबाबत संबंधित नेते फारसे अनुकूल नसतात, अशी खुली आम चर्चा पक्षाचे कार्यकर्तेच करतात.

Web Title: Dispute over 'Rajgad' due to MNS agitation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक