अपुया कर्मचायांमुळे कामांना खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:21 AM2018-02-24T00:21:19+5:302018-02-24T00:21:19+5:30
येथील महाराष्ट बॅँकेचा कारभार केवळ दोनच कर्मचायांच्या खांद्यावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, कामांचा खोळंबा होत आहे.
त्र्यंबकेश्वर : येथील महाराष्ट बॅँकेचा कारभार केवळ दोनच कर्मचायांच्या खांद्यावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, कामांचा खोळंबा होत आहे. येथील महाराष्टÑ बँकेत अवघा एक उपव्यवस्थापक व रोखपाल हे दोनच अधिकारी असल्याने बँकेच्या कारभाराचा एवढा मोठा पसारा सांभाळणे तसे शक्य होत नसले तरी कसाबसा दैनंदिन व्यवहार सुरू आहे. अशा अवस्थेत कारभार पूर्ण करावा लागतो. त्र्यंबकेश्वर येथे सन १२ डिसेंबर २०१२ पासून बँक आॅफ महाराष्टची शाखा उघडण्यात आली. अवघ्या सहा वर्षांत बँकेचा कारभार भरभराटीस आला. आज बँकेचे हजारो खातेदार आहेत. त्र्यंबकेश्वरसह १२५ गावांच्या तालुक्यात महाराष्ट्र बँकेच्या फक्त दोनच शाखा आहेत. ग्रामीण व संपूर्ण आदिवासी तालु-क्यातील या दोन्ही शाखांमध्ये कर्मचारी संख्या अपूर्ण आहे. त्र्यंबक व ठाणापाडा शाखेत तसे एक शाखा व्यवस्था-पक व दोन लिपिक व एक रोखपाल एवढे कर्मचारी असावयास पाहिजे. पण किमान एक व्यवस्थापक, एक लिपिक एक उप-व्यवस्थापक व एक रोखपाल असा चार लोकांचा स्टाफ हवा. तेव्हाच बँकेचे काम सुरळीत चालेल. त्र्यंबकेश्वर व ठाणापाडा या ठिकाणीदेखील शाखा व्यवस्थापक व लिपिक नाहीत. फक्त उपव्यवस्थापक व रोखपाल हे दोघेच बँकेचा कारभार सांभाळताना दिसतात. या दोन्ही शाखेत फक्त दोन दोन कर्मचारीच काम पहात आहेत. गर्दी वाढल्यावर ग्राहकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांची तारांबळ उडते. त्यामुळे या बॅँकेत परिपूर्ण कर्मचाºयांची नियुक्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.