बाधित संख्या पुन्हा ऑगस्टइतकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:09 AM2020-12-07T04:09:25+5:302020-12-07T04:09:25+5:30

नाशिक : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत गत महिन्याच्या उत्तरार्धापासून वाढ वेगाने होत असल्याने नाशिक जिल्ह्याची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ३३०० वर म्हणजेच ...

Disrupted numbers again as of August! | बाधित संख्या पुन्हा ऑगस्टइतकी !

बाधित संख्या पुन्हा ऑगस्टइतकी !

Next

नाशिक : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत गत महिन्याच्या उत्तरार्धापासून वाढ वेगाने होत असल्याने नाशिक जिल्ह्याची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ३३०० वर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या बाधित रुग्ण संख्येनजीक पोहोचली आहे.

यंदा ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी ॲक्टिव्ह रुग्णसंख्येचा आकडा ३,३००पर्यंत पोहोचला होता. त्याप्रमाणेच पुन्हा डिसेंबरच्या प्रारंभ बाधित रुग्णसंख्येत वाढ होऊन तो ऑगस्ट महिन्याच्या पातळीवर पोहाेचला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९७ हजार ८०० कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्य:स्थितीत ३ हजार २९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ८२६ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. सध्या नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १७९, चांदवड ७२, सिन्नर २९१, दिंडोरी १०१, निफाड ३०९, देवळा ३९, नांदगाव १०९, येवला ०८, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा ०५, पेठ ००, कळवण २६, बागलाण १३७, इगतपुरी १४, मालेगाव ग्रामीण २५ असे एकूण १ हजार ३३७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८०५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १३५, तर जिल्ह्याबाहेरील १६ असे एकूण ३ हजार २९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २ हजार ९१९ रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीण ६९२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९२०, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १७१ व जिल्हाबाहेरील ४३ अशा एकूण १ हजार ८२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

---इन्फो-----

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९३.२१ टक्के, नाशिक शहरात ९५.९८ टक्के, मालेगावमध्ये ९३.०१ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.२३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०३ इतके आहे.

Web Title: Disrupted numbers again as of August!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.