१३० मोबाइल परस्पर पाठवून लाखोंचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:03 AM2018-08-21T01:03:32+5:302018-08-21T01:04:06+5:30
जयभवानीरोड येथील न्यू सिंग मोबाइल डिस्ट्रीब्युटर्स एजन्सीमधील कामगाराने १३० मोबाइल परस्पर मुंबईच्या डिस्ट्रीब्युटर्सला पाठवून ८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकरोड : जयभवानीरोड येथील न्यू सिंग मोबाइल डिस्ट्रीब्युटर्स एजन्सीमधील कामगाराने १३० मोबाइल परस्पर मुंबईच्या डिस्ट्रीब्युटर्सला पाठवून ८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जयभवानीरोड हरी आंगन सोसायटीतील न्यू सिंग मोबाइल डिस्ट्रीब्युटर्स एजन्सीचे जसप्रितसिंग प्रितपालसिंग लांबा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या १० वर्षांपासून त्यांच्याकडे मंगेश तानाजी गायखे (३०) रा. साई लोटस अपार्टमेंट खर्जुल मळा हा कामाला आहे. वणी येथील क्रिएशन टेलिकॉमचे अमोल समदादीया यांनी गायखे याच्याकडे १३० मोबाइलची आॅर्डर दिली होती. त्यापोटी धनादेशाद्वारे पैसेदेखील न्यू सिंग एजन्सीकडे जमा झाले होते. मात्र संशयित मंगेश गायखे याने सदर १३० मोबाइल ३ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबईच्या डिस्ट्रीब्युटर्सला परस्पर पाठवून अपहार केल्याचे उघडकीस आले. याबाबत संशयित गायखे याने १३० मोबाइल परस्पर दुसरीकडे पाठवून ७ लाख ८१ हजार ३०० रुपयांच्या अपहारप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.