राजापूर परिसरात मोबाईल सेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 08:48 PM2020-11-04T20:48:51+5:302020-11-05T02:34:02+5:30
राजापूर : गाव परिसरात मोबाईल नेटवर्क सेवा वारंवार विस्कळीत व खंडीत होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वच शाळांनी मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सूरू केले असतांना मोबाईल सेवा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

येथे बीएसएनएल व जिओ या दोन्ही कंपन्यांची मोबाईल सेवा एकाच मनोर्याद्वारे दिली जाते. वीजपुरवठा खंडित झाला कि मोबाईल सेवा लगेच बंद पडते. बीएसएनएल नको म्हणून जिओ सेवेची निवड करणार्या ग्राहकांची दोन्ही सेवा खंडीत वा विस्कळीत होत असल्याने मोबाईल म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिओने मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित केले पण गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिओ मोबाईलचे नेटवर्क कधी चालु तर कधी बंद होत असल्याने ग्राहक आता दुसर्या खाजगी मोबाईल कंपनीकडे वळत आहे. विशेष म्हणजे बीएसएनएल व जिओ या दोन्ही कंपन्या ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जिओ व बीएसएनएल कंपनीने परिसरातील मोबाईल सेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.