विस्कळीतपणा : नगराध्यक्ष, नगरसेवकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट नांदगावला विकासकामांची ‘वाट’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:12 AM2018-04-18T00:12:36+5:302018-04-18T00:12:36+5:30
नांदगाव : प्रशासनातल्या विस्कळीतपणामुळे शहरातील दैनंदिन व विकासकामांची वाट लागली असल्याची तक्र ार घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली.
नांदगाव : प्रशासनातल्या विस्कळीतपणामुळे शहरातील दैनंदिन व विकासकामांची वाट लागली असल्याची तक्र ार घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. पूर्णवेळ अभियंता नाही, मुख्य अधिकारी यांच्यासह जबाबदारीच्या पदांवरील अनेक कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळा पाळत नाहीत, नगरसेवकांनी केलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नाही आदी तक्रारींचे निवारण करण्याचे मान्य करून राधाकृष्णन बी. यांनी येवला-मनमाड येथील अभियंत्याला अतिरिक्त पदभार देणे, कर्मचाºयांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी नगर परिषद कार्यालयात अचानक पाठवून कामावर वेळेवर न येणाºया कर्मचाºयांची तपासणी करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना दिल्या.
सहा महिन्यांपूर्वी नांदगाव येथे ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत समस्यांबाबत नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी मुद्दा मांडला होता. भुसे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कामकाजात सुधारणा झाली नाही. अखेर नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली. यावेळी माणिकपुंज धरणातून पिण्याच्या पाण्याच्या दहा कोटी रु पये खर्चाच्या नवीन योजनेचा प्रस्ताव माहितीसाठी राधाकृष्णन यांच्याकडे नगराध्यक्षांनी सादर केला. सिन्नर येथील अभियंता फुलारे यांच्याकडे नांदगावचा अतिरिक्त पदभार आठवड्यातून दोन दिवसांसाठी देण्यात आला असून, तेही येथे नियमित येत नाहीत. त्यामुळे अतिक्रमण, बांधकाम व विकासकामांच्या तांत्रिक मंजुरी, देखरेख आदी कामे ठप्प झाली आहेत. उपनगराध्यक्ष कामिनी साळवे, नगरसेवक महावीर पारख, अभिषेक सोनवणे, नितीन जाधव, वाल्मीक टिळेकर, सुनंदा पवार, मनीषा काकळीज, संगीता जगताप, आदी उपस्थित होत्या. मनमाड शहर जवळ असून, तालुक्यातील असल्याने तेथील अभियंत्यास नांदगावचा अतिरिक्त पदभार देण्याच्या मागणीला जिल्हाधिकारी यांनी नकार दिला. लेखापाल (२), स्थापत्य अभियंता (२) व संगणक अभियंता (१), पाणीपुरवठा अभियंता (१), सहा. कर निरीक्षक (१), सहा. मिळकत व्यवस्थापक (१), सहा. खरेदी पर्यवेक्षक (१), अग्निशमन पर्यवेक्षक (१), सहा. नगररचनाकार (१) ही पदे रिक्त आहेत. १२ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. प्रशासनाने कार्यवाही न केलेल्या १८० ठरावांच्या प्रतींची फाइल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आली.