उपनगरांमध्ये जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:11 PM2020-06-03T22:11:05+5:302020-06-04T00:46:35+5:30
नाशिकरोड : परिसरात बुधवारी सोसाट्याचा वारा व दिवसभर पावसामुळे जनजीवनावर विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी तळे साचले, तर अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले होते.
नाशिकरोड : परिसरात बुधवारी सोसाट्याचा वारा व दिवसभर पावसामुळे जनजीवनावर विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी तळे साचले, तर अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले होते.
नाशिकरोडला पावसाची रिमझिम सकाळपासूनच सुरू झाल्याने सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे रस्त्यावरील विक्रेते, दुचाकीचालक, पादचारी यांची गर्दी कमी झाली होती. बाजारपेठेतदेखील शुकशुकाट पसरला होता. परिसरामध्ये दुपारनंतर जोरदार वारा वाहू लागल्याने जयभवानी रोड, विराज स्वीट्समागे, जलतरण तलावामागील शर्मा व्हिला व आर्टिलरी सेंटर रोड, गवळीवाडा येथे अनेक वृक्ष उन्मळून पडले. तर काही ठिकाणी झाडे कलली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या . मनपा अग्निशामक दलाच्या जवानांनी भरपावसात उन्मळून पडलेले झाड कटरच्या साह्याने कापून दूर केले. नाशिकरोड परिसरात सर्वत्र विजेचा लपंडाव सुरू असल्याने रहिवासी त्रस्त झाले होते. तर वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडला होता.
---------------------------
दुपारनंतर अंबड-सातपूरच्या कारखान्यांना सुट्टी
४राज्यातील निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योजकांशी चर्चा करून बुधवारी दुपारी ३ वाजेनंतर सर्व कारखाने बंद करून कामगारांना सुट्टी दिली. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश भामरे यांनी उद्योजकांना सूचना केल्या.
४राज्यात निसर्ग चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार संभाव्य वादळामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेता बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सातपूर, अंबड व सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात पाणीपुरवठादेखील खंडित होण्याची शक्यता गृहीत धरून अंबड औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योगांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली. उद्योजकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, धनंजय बेळे यांनी केले आहे.
--------------------
सातपूरला आपत्कालीन पथक सज्ज
निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सातपूर विभागाने आपत्ती व्यवस्थापन कर्मचाºयांचे तीन पथके तयार ठेवण्यात आली आहे.,तर ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या निर्देशानुसार निसर्ग चक्रीवादळाचा नाशिकला फटका बसण्याची शक्यता आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, तर महानगरपालिका प्रशासनाने दुपारीच सातपूर परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
सातपूर विभागीय कार्यालयातील विविध खात्यातील कर्मचाºयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार ठेवण्यात आली आली आहे. सहा सहा कर्मचाºयांचे तीन गट तीन पाळ्यांमध्ये तैनात केले असून अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना देखील सावध राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विभागीय अधिकारी लक्ष्मण गायकवाड यांनी दिली आहे.