वाहनचालकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:52+5:302021-05-06T04:15:52+5:30

बांधावर खत पुरवठा नाशिक : कृषी विभागाने याहीवर्षी शेतकऱ्यांना बांधावर खत पुरवठा करण्याचे नियोजन केले असून, याबाबत लवकरच कार्यवाही ...

Dissatisfaction among motorists | वाहनचालकांमध्ये नाराजी

वाहनचालकांमध्ये नाराजी

Next

बांधावर खत पुरवठा

नाशिक : कृषी विभागाने याहीवर्षी शेतकऱ्यांना बांधावर खत पुरवठा करण्याचे नियोजन केले असून, याबाबत लवकरच कार्यवाही होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगामाची तयारी

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे कामात अडथळे येत असले तरी शेतकरी आपापल्या परीने समस्यांचे निराकरण करत आहे.

लसीकरणाबाबत नाराजी

नाशिक : शहरात अद्याप लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक नागरिक सकाळी केंद्रावर जाऊन नंबर लावतात; पण लस उपलब्ध न झाल्यास त्यांना माघारी फिरावे लागते.

विक्रेते अडचणीत

नाशिक : कडक निर्बंधांमुळे शहरात खाद्यपदार्थ विकून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे. मागील काही दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Dissatisfaction among motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.