कोरोनाबाधिताच्या नातेवाइकांनीच रस्ता मोकळा केल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:36 PM2020-06-17T22:36:47+5:302020-06-18T00:37:39+5:30
सिडको : पाथर्डी-पिंपळगाव खांब रोडवरील जाधव मळा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने महापालिकेने सदरचा रस्ता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून रस्ता बंद केलेला असताना सदर रुग्णाच्या नातेवाइकांनीच रस्ता मोकळा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने नाराजी व्यक्त केली आहे.

जाधव मळा या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्णावर उपचार सुरू असून, रुग्ण राहत असलेला परिसर मनपा आरोग्य विभागाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून सदरचा रस्ता जाण्या-येण्यासाठी बंद केला होता; परंतु रुग्णाच्या नातेवाइकांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
मनपा आरोग्य विभागाने या ठिकाणी पाहणी करून त्वरेने रस्ता बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
---------------
पाथर्डी-पिंपळगाव खांब भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील रस्ता काही नागरिकांनी मोकळा केल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने इंदिरानगर पोलीस ठाण्यास तसे कळविले असून, यापुढील कारवाई करतील.
- संदेश शिंदे
विभागीय अधिकारी मनपा