पालखी सोहळ्यात अधिकाऱ्यांच्या प्रवेशाने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:03 PM2020-06-27T23:03:31+5:302020-06-27T23:06:04+5:30
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दरवर्षाप्रमाणे यंदा त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पायी पालखी व दिंडी पंढरपूरला नियोजित वेळेत रवाना होऊ शकली नाही. परंतु आषाढी एकादशीलाच राज्यातून संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूर येथे रवाना होणार असून, त्यात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पालखीचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दरवर्षाप्रमाणे यंदा त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पायी पालखी व दिंडी पंढरपूरला नियोजित वेळेत रवाना होऊ शकली नाही. परंतु आषाढी एकादशीलाच राज्यातून संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूर येथे रवाना होणार असून, त्यात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पालखीचा समावेश आहे.
बसमधून जाणाºया या पालखीसमवेत केवळ वीस वारकºयांना शासनाने परवानगी दिली असून, त्यात आता पोलीस, वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचा सहभाग असल्याने तसेच ६५ वयावरील ज्येष्ठ वारकºयांना परवानगी नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानच्या पदाधिकाºयांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन यासंदर्भातील ६५ वयावरील ज्येष्ठ नागरिकांची अट शिथिल करावी, याबाबत साकडे घातले आहे. तसेच प्रशासकीय अधिकाºयांना वारीच्या बसमध्ये समावेश करण्यास वारकºयांचा विरोध आहे, संस्थानच्या पदाधिकाºयांनी भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, पालखी वाहनातून (बसमधून) जाण्यास शासनाने केवळ वीस वारकºयांना परवानगी दिली असून, त्यातून आता पोलीस, वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश केल्याने वीस वारकºयांना त्यात सहभागी होता येणार नाही, त्यातच ६५ वर्षांहून अधिक वयाच्या वारकºयांना सहभागाला प्रशासनाने हरकत घेतल्याने ज्येष्ठ विश्वस्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील वारकरी शिवशाही बसने संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी घेऊन जाणार
आहेत. त्यात दोन मानकरी, दोन झेंडेकरी, दोन पुजारी, दोन पोलीस, दोन वैद्यकीय
अधिकारी आणि दहा विश्वस्तांचा समावेश असेल. मात्र विश्वस्तांमध्ये तीन ते चार विश्वस्त हे ६५पेक्षा जास्त वयाचे असल्याने
त्यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही, त्याबद्दल या पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. योग्य उपाययोजना
तीन जिल्ह्यातून जाणाºया या वारीत जिल्हाबंदीचे नियमामुळे ज्येष्ठांना प्रतिबंध आहे. त्यामुळे ज्येष्ठांना प्रवासात परवानगीसाठी शासनस्तरावर निर्णय घ्यावा लागणार आहे. यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना यासंबंधीचे निवेदन दिले आहे. यासंबंधी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळाल्याचे विश्वस्तांनी सांगितले.योग्य खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस,
रु ग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक वारीसोबत देण्यात यावे. मात्र त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन असावे. नियोजित वारकºयांच्या बसमध्ये यांचा समावेश करू नये. वारीसाठी वीस वारकरी असावेत, असे ठरल्याने दोन स्वतंत्र वाहन असल्यास सोयीचे होईल.
- पुंडलिकराव थेटे, विश्वस्त,
संत निवृत्तिनाथ देवस्थान