लोकसेवा आयोगाची परीक्षा लांबल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 08:59 PM2021-03-11T20:59:12+5:302021-03-12T00:39:37+5:30
मेशी : गेल्या वर्षापासून सतत कोरोनाची कारणे देऊन राज्यलोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देमागील वर्षी घेतलेल्या काही परीक्षांचे निकालही जाहीर केले नाहीत.
मेशी : गेल्या वर्षापासून सतत कोरोनाची कारणे देऊन राज्यलोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी (दि. १४) होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना समजताच नाराजीचा सूर पसरला आहे.
बहुतेक विद्यार्थी सर्वसाधारण तसेच शेतकरी कुटूंबातील आहेत. मागील वर्षी घेतलेल्या काही परीक्षांचे निकालही जाहीर केले नाहीत. त्यामुळे अधिकच नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने याबाबतचा निर्णय बदलून वेळेवरच परीक्षा घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे.