लस उपलब्ध न झाल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:50+5:302021-04-18T04:13:50+5:30
रजिस्ट्रेशनच्या विलंबामुळे वाढते गर्दी नाशिक : लसीकरण केंद्रांवर रजिस्ट्रेशन लवकर होत नसल्याने अनेकांना टातकळत उभे राहावे लागते. यामुळे गर्दी ...
रजिस्ट्रेशनच्या विलंबामुळे वाढते गर्दी
नाशिक : लसीकरण केंद्रांवर रजिस्ट्रेशन लवकर होत नसल्याने अनेकांना टातकळत उभे राहावे लागते. यामुळे गर्दी वाढते. अनेक ज्येष्ठ नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
सलून कारागिरांची मदतीची मागणी
नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून सलूनची दुकाने बंद असल्यामुळे येथील कारागिरांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कारागिरांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
अनेक गावांमध्ये कोरोना कृती समिती
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक गावांमध्ये कोरोना कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावात काही दिवस स्वयंस्फूर्तीने बंदही पाळला जात असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रुग्णांचा सार्वजनिक ठिकाणी वावर
नाशिक : ग्रामीण भागात गृहविलगीकरणात असलेले अनेक रुग्ण सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी अशा रुग्णांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठ्याची तक्रार
नाशिक : शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सकाळी पाणी कमी वेळ ्रआणि कमी दाबाने पाणी राहत असल्याने महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. महापालिकेने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी
नाशिक : ऐन उन्हाळ्यात दिवसातून दोन- तीन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने गृहोद्योग करणाऱ्या अनेक महिलांची काम खोळंबतात. राज्य वीज वितरण कंपनीने याबाबत योग्य ती काळजी घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
फळांची मागणी वाढली
नाशिक : कोरोनामुळे फळांना चांगली मागणी वाढली आहे. यामुळे फळांचे दर वाढले आहेत. संत्रा, किवी या फळांना विशेष मागणी आहे. फळांची आवक स्थिर आहे.
रिक्षाचालक पर्यायी मार्गाच्या शोधात
नाशिक : बंदमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मागील वर्षभरापासून आर्थिक तोंड द्यावे लागत असल्याने अनेक रिक्षाचालकांनी पर्यायी मार्ग शोधला आहे. काहींनी मिळेल ती नोकरी करणे पसंत केले आहे, तर काहींनी व्यवसाय सुरू केला आहे.