लस न मिळाल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:06+5:302021-07-01T04:12:06+5:30
रिचार्जचा खर्च वाढला नाशिक : अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केल्याने अनेक नागरिकांचा मोबाईल रिचार्जचा खर्च वाढला आहे. अनेकांनी ...
रिचार्जचा खर्च वाढला
नाशिक : अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केल्याने अनेक नागरिकांचा मोबाईल रिचार्जचा खर्च वाढला आहे. अनेकांनी घरात वायफायची सुविधा करुन घेतली आहे. मात्र यासाठीही मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नगदी पिकांकडे कल
नाशिक : नाशिक तालुक्यात शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे कल दिसून येत आहे. यामुळे भाजीपाला पिकांची लागवड वाढली आहे. काही प्रयोगशील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नव्या पिकांची लागवड करत आहेत.
बाजार समितीत नियमांकडे दुर्लक्ष
नाशिक : येथील बाजार समितीत लिलावाच्या वेळी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दीमुळे कोरोना नियमांचे पालन होत नाही. बाजार समिती प्रशासनाने याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
भाविकांमध्ये नाराजी
नाशिक : निर्बंध शिथिल झाल्याने रामकुंड परिसरात धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. मात्र या परिसरात करण्यात आलेल्या खोदकामांमुळे भाविकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.