वाढत्या महागाईमुळे नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:47+5:302021-01-20T04:15:47+5:30
नाशिक : दिवसागणिक पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडु लागले आहेत. यामुळे अनेकांचे बजेट कोलमाडले आहे. वाढत्या दरामुळे अनेकांनी सार्वजनिक ...
नाशिक : दिवसागणिक पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडु लागले आहेत. यामुळे अनेकांचे बजेट कोलमाडले आहे. वाढत्या दरामुळे अनेकांनी सार्वजनिक परिवहन सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना दुचाकीही परवडेनासी झाली आहे. शासनाने पेट्राेल, डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी होत आहे.
गोदापात्रात कपडे धुण्याचे प्रकार सुरूच
नाशिक : गोदापात्रात कपडे धुण्यास बंदी असली तरी अनेक नागरिक सर्रासपणे गोदापात्रात कपडे धुत असल्याचे दिसुून येत आहे. यामुळे गोदावरीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिकेने अशा नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
शहरात साथीच्या आजारांत वाढ
नाशिक : शहरातील विविध डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेक साथीच्या आजारांचा फैलाव झाला असल्याने किरकोळ आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याचे सांगितले जात असून, नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
रस्त्यावरील वाहनांमुळे अडथळा
नाशिक :पंडित कॉलनी परिसरात असलेल्या विविध खाद्य पदार्थांच्या दुकानांसमोर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी दुचाकीबरोबरच चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे पादचाऱ्यांना चालनेही मुस्कील होते. याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
व्यापारी संकुलांसमोर वाहनांची गर्दी
गावोगावी सत्कार समारंभ
नाशिक : ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक गावांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे. निवडणुकांमुळे गावागावात उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी मोठ्या स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी गावातल्या गावात कार्यक्रम उरकले जात आहेत.
नाशिक : गंगापूर रोडवरील व्यापारी संकुलांसमोर होणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे या ठिकाणाहून पायी चालनेही कठीण होते. अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. काही संकुलांसमोर पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.