बेशिस्त वाहनचालकांमुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:55+5:302021-07-11T04:11:55+5:30

मजुरीचे दर वाढल्याने भुर्दंड नाशिक : ग्रामीण भागात खरीप कामांची लगबग सुरू आहे. यामुळे मजुरवर्गाला मोठ्या प्रमाणात काम मिळत ...

Dissatisfied with unruly drivers | बेशिस्त वाहनचालकांमुळे नाराजी

बेशिस्त वाहनचालकांमुळे नाराजी

Next

मजुरीचे दर वाढल्याने भुर्दंड

नाशिक : ग्रामीण भागात खरीप कामांची लगबग सुरू आहे. यामुळे मजुरवर्गाला मोठ्या प्रमाणात काम मिळत आहे. काही ठिकाणी मजुरांची टंचाईही जाणवत आहे. या वर्षी मजुरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कामगारांची गैरसोय

नाशिक : दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्य कामगारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शहरातून सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी अनेक कामगार दुचाकीचा वापर करतात. मात्र पेट्रोलचे दर वाढल्याने अनेकांना दररोज वाहनात पेट्रोल भरणे परवडेनासे झाले आहे.

कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांमध्ये बाचाबाची

नाशिक : शहरातील अनेक भागांत लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाचे काम ठप्प झाले आहे. लसींचा पुरवठा नेमका कधी होणार याबाबत केंद्रप्रमुखांनाही काही माहिती नसल्याने अनेकवेळा ज्येष्ठ नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडतात.

फुलांच्या आवकेवर परिणाम

नाशिक : शहरातील मंदिरे अद्याप बंद असल्याने फुल विक्रेते अडचणीत आले असून, त्याचा परिणाम फुलबाजारावरही झाला आहे. दर मिळत नसल्याने फुलबाजारातील आवकेवरही परिणाम झाला आहे. अनेक शेतकरी बाजारात माल आणत नसल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल रिचार्जचा खर्च वाढला

नाशिक : शहरातील अनेक शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू झाल्याने लहान मुलांना बराच वेळ फोनसमोर बसून राहावे लागत असल्याचे दिसते. यामुळे अनेक पालकांचा मोबाइल रिचार्जचा खर्चही वाढला असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे.

Web Title: Dissatisfied with unruly drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.