विंचुरदळवी शिवारात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 03:40 PM2020-01-09T15:40:14+5:302020-01-09T15:40:22+5:30

विंचुरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरदळवी शिवारातील दारणाकाठी भागात मंगळवारी सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास उसाच्या शेतात वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून त्याची रवानगी मोहदरी वनोउद्यानात केली आहे.

Dissatisfied with Vichuradalvi Shiva | विंचुरदळवी शिवारात बिबट्या जेरबंद

विंचुरदळवी शिवारात बिबट्या जेरबंद

Next

विंचुरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरदळवी शिवारातील दारणाकाठी भागात मंगळवारी सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास उसाच्या शेतात वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून त्याची रवानगी मोहदरी वनोउद्यानात केली आहे.
गेल्या काही दिवसापासून या भागात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग शेतीच्या कामाला जाण्यास धजावत नव्हता. ग्रामस्थांच्या मागणीनतंर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दारणाकाठी रमेश एकनाथ कानडे यांच्या मालकीच्या उसाच्या शेत गट नंबर ६२८ मध्ये तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी संध्याकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान गणेश कानडे यांनी बिबट्या पिंजºयात अडकलेला पाहिला. त्यानतंर वनविभागला याबाबत माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी. के. आगळे, वनरक्षक कैलास सदगीर, बाबूराव सदगीर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
येथील पंढरी डावखर, सुरेश शेळके, तुषार दळवी, प्रसाद शेळके, श्याम दळवी, विजय शेळके, प्रज्वल दळवी, संदेश दळवी, समाधान भोर, आदीनी वनविभागाच्या कर्मचाºयांना पिंजरा शेताबाहेर काढण्यासाठी मदत केली.

Web Title: Dissatisfied with Vichuradalvi Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक