लोकसहभागातून पाझरतलावाची दुरूस्ती
By admin | Published: June 4, 2016 10:17 PM2016-06-04T22:17:58+5:302016-06-04T23:59:46+5:30
लोकसहभागातून पाझरतलावाची दुरूस्ती
कऱ्ही : तंटामुक्त समिती,ग्रामपंचायतीचा पुढाकारमनमाड: येथून जवळच असलेल्या कऱ्ही ता: नांदगाव येथील ग्रमास्थांनी लोकसहभागातून वन विभागाच्या पाझर तलावाची दुरूस्ती करून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा सदेश परिसरातील जनतेला दिला आहे. येथील तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमामुळे काही प्रमाणात दुष्काळावर मात करता येणार आहे.
कऱ्ही या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाल्या नंतर येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेउन जलसंवर्धनासाठी काम करण्याचे ठरवले.येथे १९७५ साली वन विभागाच्या वतीने पाझर तलाव बांधन्यात आला होता. कालांतराने तो फुटून त्याची दुरावस्था झाली.मनमाड चे पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनातून तंटामुक्त समिती ग्रामस्थांनी शासनाच्या निधीची वाट न पहाता लोकसहभागातून या बंंधाऱ्याची दुरस्ती करण्याचा निर्णय घेतला.त्या साठी दानशूर लोकांनी जेसीबी मशीन काही लोकांनी ट्रॅक्टर, डिझेल देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. लोकांच्या सहभागातून व श्रमदानातून या बंधाऱ्याची दुरूस्ती करण्यात आली आहे.या साठी सरपंच आशाबाई काकड, उपसरपंच देवराम ढाकणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर राख, पंढरीनाथ काकड,कृउबा संचालक दशरथ लहिरे,सुधाकर घुगे, दत्तू डोंगरे, साहेबराव सांगळे, आण्णा डोंगरे,राजाराम दराडे, सुदाम दराडे,विष्णू डोमाडे,नंदू डोंगरे, त्र्यंबक डोंगरे,बीट कर्मचारी दगू बारहाते,सलीम शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.(वार्ताहर)